Admission 2024-25

 

विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला

रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयातर्फे ४८ वी विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला आभासी (ऑनलाईन पद्धतीने) आयोजित होत आहे. यंदाचे वर्ष हे अनेक मान्यवरांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने साहित्य, नाटक आणि संगीत या तीन क्षेत्रांतील मान्यवरांना आदरांजली अर्पण करणे असे सूत्र व्याख्यानमालेसाठी  निवडले आहे.  या व्याख्यानमालेचे प्रणेते प्रा. वसंत बापट यांचेही हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांना अभिवादन करणारे पहिले व्याख्यानपुष्प गुंफले आहे. प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांची जन्मशताब्दी आणि ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा सुवर्ण महोत्सव यादृष्टीने दुसरे तर ख्यातकीर्त गायक पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून तिसरे पुष्प योजले आहे.
दिनांक २३,२४ आणि २५ जानेवारी २०२२ रोजी  सांयकाळी ६:३० वाजता ही व्याख्याने होतील.
ऑनलाईन व्यासपीठ : ZOOMMeeting ID: 815 7254 4885 Passcode: 410100
व्याख्यानाला जोडून घेण्यासाठी दुवा (लिंक):  Click Here
 

।। सर्वांचे हार्दिक स्वागत ।।

डॉ अनुश्री लोकुरप्राचार्य

डॉ लीना केदारेकार्याध्यक्ष