Certificate Courses


प्रमाणपत्र अभ्यासक्रम ( सर्टिफिकेट कोर्स) चित्रभाषा

शिकूया चंदेरी दुनियेच्या पडद्यावरील गोष्टी... पन्नास वर्षांनी मराठी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून दिलेला आणि भारताकडून ऑस्करसाठी पाठविण्यात आलेला 'श्वास' तसेच 'नदी वाहते', 'या गोष्टीला नावच नाही' यांसारख्या पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक मा.संदीप सावंत यांच्या सोबत..

डिसेंबर २०२६ पासून सुरू (दर शुक्रवार आणि शनिवार )

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

  • कोर्स स्वतः श्री. संदीप सावंत प्रत्यक्ष स्वरूपात (ऑफलाईन) रुईया महाविद्यालयात घेतील.
  • सर्वांसाठी खुला- रुईया महाविद्यालयातील विद्यार्थी वा महाविद्यालयाबाहेरील कोणीही इच्छुक व्यक्ती सहभागी होऊ शकतात. वयाची अट नाही.
  • एकूण ३० तासांचा अभ्यासक्रम, प्रत्येकी ५ तासांची ६ सत्रे
  • अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाईल.
  • अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या रुईया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत 2 अधिकचे श्रेयांक (2 Extra Credits) नमूद केले जातील.
  • अभ्यासक्रमातील सहभागींपैकी काहींना संदीप सावंत यांच्या आगामी चित्रपट प्रकल्पात त्यांच्यासोबत कामाची संधी!

अभ्यासक्रमाची उद्दिष्ट्ये

ही कार्यशाळा संवाद आणि विविध सरावांमधून उलगडत जाईल. गोष्ट आणि सिनेमाची पटकथा म्हणजे नेमकं काय हे जाणणे सिनेमाकरिता संशोधन आणि माणूस व परिस्थिती समजून घेणं म्हणजे नक्की काय असतं हे उलगडणे पटकथाकार आणि दिग्दर्शक यांच्या दृष्टिकोनातून चित्रभाषा म्हणजे काय हे समजून घेणे सिनेमाचा फोकस कसा शोधायचा हे समजून घेणे पटकथा प्रत्यक्ष पडद्यावर सादर करणे म्हणजे काय असतं हे समजून घेणे दिग्दर्शक आणि पटकथालेखकाकरिता सर्व कला, साहित्य, इतिहास, भूगोल, समाजविज्ञान यांची समज असणे का महत्वाचे आहे ते जाणून घेणे सिनेमा करताना तंत्र आणि तंत्रज्ञान म्हणजे काय ते जाणणे

अभ्यासक्रमाचे शुल्क- रु. ३०००/-

आजच नोंदणी करा! (मर्यादित जागा उपलब्ध) नोंदणीसाठी (लिंक )

अधिक माहितीसाठी संपर्क : प्रतिक पवार - ८६५५८३९५७२
संपर्कासाठी ईमेल : [email protected]

Talk to Us