वाचन संकल्प महाराष्ट्राचा


वाचनवृद्धी होण्याकरता ग्रंथप्रदर्शने ही खूप महत्त्वाची आहेत. ग्रंथालयात आकर्षक प्रदर्शन बनवून मांडलेली पुस्तके वाचकांना वाचाविशी वाटू शकतात. त्यातून त्यांना वाचनाची आवड लागू शकते आणि त्यांना स्वतःचा सर्वांगिण व्यक्तिमत्त्व विकास साधता येऊ शकतो. याकरता “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमाअंतर्गत रूईया ग्रंथालयाने जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आभासी पुस्तक कपाट (Virtual Bookshelf) बनवण्याचे ठरवले. थोर व्यक्तींची चरित्रे वाचून वाचकांना जीवनातील अडचणींवर मात करण्याचे बळ आणि यश मिळवण्याची स्फूर्ती मिळते. याकरिता ग्रंथालयाने "महाराष्ट्राचे शिल्पकार" हे आभासी पुस्तक-कपाट सादर केले. या कपाटात महाराष्ट्राला घडवणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांची प्रेरणादायी चरित्रे मांडलेली आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाद्वारे वाचनाकरता व डाऊनलोड करण्यासाठी मुक्त उपलब्ध असलेली इ-पुस्तके या पुस्तककपाटात प्रदर्शित करण्यात आली आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर फक्त एक क्लिक किंवा टॅप करून सर्वांना ही पुस्तके वाचण्याचा आनंद घेता येईल.

Talk to Us